51व्या दिवशीही जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत संप सुरूच…… — 26 जानेवारी रोजी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जणसंपर्क कार्यालयावर धडकणार आयटक चा विशाल मोर्चा…..! — हजारो आशा व गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी होणार सहभागी — कॉ. विनोद झोडगे.

प्रितम जनबंधु

     संपादक 

         गडचिरोली:- 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविका तर १२ जानेवारी २०२४ पासून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्याकरिता बेमुदत संपावर आहेत आज 12 व्या दिवशी एक आनंदाची बातमी मिळालेली आहे की आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० देण्यात येणार. २. आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु. ७००० ची वाढ देण्याचा, ३. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु. १०००० ची वाढ देण्याचा तर अंगणवाडी सेविकांना किमान वेतन, पेन्शन, ग्राजुयटी देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला आहे म्हणून आता सर्व आशा वर्कर, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचे लक्ष २४ जानेवारी च्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले होते परंतु आजही मंत्री मंडळ बैठक न झाल्याने आजच्या बेमुदत चाललेल्या धरणे आंदोलनातून महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यात आला आहे.

                     जर महाराष्ट्र सरकारने आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, आशा, गट प्रवर्तक कर्मचारी हे मुंबईचे आझाद मैदान शिवाजी पार्क व इतर मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाला बसतील तसेच प्रजासत्ताक दिनी मंत्रांच्या कार्यालय वर मोर्चे काढले जातील, असे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बाल विकास मंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. 

              त्या अनुषंगाने आज धरणे आंदोलनात 51 व्या दिवशीही काँ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक व जिल्हाध्यक्ष कॉ.देवराव चवळे यांनी प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर येथील पालक मंत्री तथा मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जणसंपर्क कार्यालयावर आझाद बगीचा येथून सकाळी 11 वाजता आयटक च्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढन्याचा इशारा देत आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी यांनी संप सुरूच ठेवले आहे.

                     आजच्या धरणेआंदोलनाचे नेतृत्व कॉ.विनोद झोडगे, कॉ.देवराव चवळे, वैशाली सोनटक्के, विद्या येजुलवार, राधा ठाकरे, शैला पठाण, मीनाक्षी झोडे, रेखा जांभुळे, रूपा पेंदाम, रुक्साना शेख, पार्वती दुर्गे, कॉ.रजनी गेडाम, सरिता नैताम, यांनी केले.