नंदलाल पाटील कापगते विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा…

      निलय झोडे

नागपूर विभागिय प्रतिनीधी

      नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य के. एस. डोये सर तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्राध्यापिका स्वाती गहाणे मॅडम तसेच सौ.आर.बी. कापगते, प्रा. व्ही.बि. काशीवार सर उपस्थित होते.

       श्रीराम लल्लाचे पूजन करून विधिवत पूजाअर्चा करून आरती करण्यात आली व भक्तिमय वातावरण निर्माण केले.

        प्राध्यापिका स्वाती गहाणे मॅडम यांनी प्रभू श्रीराम यांच्या रामरक्षा स्त्रोताने आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच प्रभू श्रीराम यांचे जीवन व त्याग याविषयी सखोल मार्गदर्शन करून श्रीराम यांचा आदर्श समोर ठेवून आचारी-विचार अंगीकृत करून जीवन जगले पाहिजे असे विचार ठेवले.

         सर्व विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम यांचा जयजयकार करीत अत्यंत मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. 

           कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर केले. 

         यावेळी प्रा. बी.पी. बोरकर सर, प्रा. सुमन पुस्तोडे सर ,प्राध्यापिका रविता बोरकर, प्राध्यापिका भूमिका नाकाडे, प्राध्यापिका भावना गहाणे, प्रा. प्रकाश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे संचालक प्रा. सुनील कापगते सर यांनी तर आभार प्रदर्शन डी.डी.तुमसरे सर यांनी केले. 

         सरते शेवटी प्रसाद वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.