सोडे आश्रम शाळेजवळ अपघातात तरुण ठार.. 

भाविक करमनकर..

तालुका प्रतिनिधी धानोरा..

       धानोरा रांगी रोड वर सोडे गावाजवळील आश्रम शाळे जवळ काल सायंकाळी 6 वाजता ट्रॅक्टर व दुचाकी यांचा अपघात होऊन सोडे येथील विक्की किरंगे वय वर्ष 26 याचा अपघात झाला.त्याला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालय उपचार साठी आणले असता डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.मृत्यू झाल्याचे ऐकताच घरच्यानी हंबरडा फोडला.

          सविस्तर वृत्त असे की 

सदर मृत व्यक्ती हा सोडे येथील रहिवासी असून तो काही कामासाठी धानोरा येथे आला होता.आपले काम आटोपून आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच.33,एफ.3068 या दुचाकीने सोडे आपल्या गावाकडे जात असताना सोडे आश्रम शाळे समोरील असलेल्या वळणावर सोडे वरून येत असलेल्या एम.एच.33,4605 क्रमांकची ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात अपघात होऊन विक्की किरंगे याचा अपघात झाला.

         उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

          तो एकुलता एक असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.मनमिळाऊ स्वभाव असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस स्टेशनं करीत आहे.