नवजीवन सीबीएसई मध्ये सद्भावना दिवस साजरा….

ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

 

साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे भारताचे पुर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जंयती पित्यर्थ सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास प्रशासकिय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, द्विपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी सद्भावना दिवसाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, सद्भावना म्हणजेच दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवणे असा आहे. राजीव गांधी सरकारचे एकमेव मिशन दुसऱ्यांच्या प्रति चांगली भावना ठेवणे असा होता. सर्व धर्म, समुदाय यांच्यात समरसता, राष्ट्रीय एकता, शांती, प्रेम आणि आपुलकी वाढविणे असा होता. तसेच विद्यार्थ्यांना आव्हान केले की, सर्वाप्रती आदर, चांगले विचार, प्रेम आपूलकी ठेवून राष्ट्रशांती कार्यास सहकार्य करावे यासाठी विद्यार्थ्यांकडून सद्भावना प्रतिज्ञा घेण्यात आली.

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती डोंगरवार व आभार दिपा येडे यांनी केले.