उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करा : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांची मागणी…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक 

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न असल्याने शेतकऱ्यांना मध्ये तीव्र सांतप व असंतोष पसरले आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी भरपूर नुकसान झाले आहे.तरी हा तीन चार दिवसात लवकरत लवकर धान खरेदी सुरु करण्यात यावी अशी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा साहेबांची दूरध्वनीद्वारे संवाद साधून.धान उत्पादक शेतकऱ्यांचा समस्या सविस्तरपणे सांगून मागणी केली आहे.या तीन चार दिवसात उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायटी मार्फत धान खरेदी न केल्यास उत्पादक शेतकऱ्यांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन नियमाचे पालन करून आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे.