वडसा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन…

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.23: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 मे 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा येथे ठिक 10.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

 सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या, महामंडळे उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ घेण्यासाठी‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता असलेले ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने, दि.26 मे 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.