विलासजी ताटे- देशमुख यांच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा नरसिंहपुर पावन भूमीमध्ये उत्साहात साजरा. — तर गोरगरीब गरजु विद्यार्थी व ग्रामस्थांना विविध साहित्य व खाऊचे वाटपही करण्यात आले…

नीरा नरसिंहपुर दिनांक :21

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

निरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा (वाढदिवस) उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.

 निरा नरसिंहपूरचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे इंदापुर तालुका सचिव विलासजी ताटे-देशमुख यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालया मध्यील गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन,शाळेचा ड्रेस व खाऊचेही वाटप करण्यात आले.

          हा उपक्रम प्रत्येक वर्षी माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढ दिवसा निमित्त साजरा करण्यात येतो.

        शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊचे वाटप केल्यामुळे विलासजी ताटे- देशमुख यांचा हार फेटा शाल देऊन सन्मानीत करण्यात आले व विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस यावेळी माजी सरपंच विलासजी ताटे देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

         या कार्यक्रमाचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे सचिव विलासजी ताटे देशमुख, माजी सरपंच संतोष मोरे, युवा शिवसेना तालुका अध्यक्ष व माजी सरपंच आण्णासाहेब काळे, नरसिंहपुरचे विद्यमान सरपंच विजयजी सरवदे, बळीराम गलांडे, रामभाऊ गलांडे , बाबासाहेब महाडिक तसेच शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.