उत्तमराव पाटिल जैव विविधता उद्यानकडे दुर्लक्ष… — उद्यानात आढळल्या दारूच्या बाटला…

 

धानोरा /भाविक करमनकर 

धानोरा तालुक्यातील एकमेव बगीचा धानोरा शहरांत आहे आणि तोही दुर्लक्षित आहे उद्यानाच्या प्रवेश दाराजवळ लावलेला फलकही पूर्णपणे फाटलेला आहे.

        बगिच्यात असलेल्या झाडाची निगा व कटाई न केल्यामुळे तसेच झाडाभोवती गवत कचरा मोठ्या प्रमाणात वाढला त्यामुळे बगिच्याचे सोंदर्य विद्रुप झाले आहे बगिच्यात लहान मुलाचे खेळण्याचे साहित्या भोंवती गवत कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

      त्यामुळे तेथे सरपटणारे प्राणी जसे साप विंचू यापासून लहान मुलांना तसेच मोठ्या ना सुद्धा याचा धोका पोहचू शकतो तसेच या बगीच्यात असणारे बेंच च्या खाली व बांबू झाडाच्या जवळ विदेशी दारूच्या बाटाला सोबत चकणा ग्लास इत्यादी साहित्य त्या ठिकाणी पडुन आहे.

      बगिच्यात दारू पितात हे यावरून दिसून येते दारू पिणाऱ्या शौकींनांनी बगीचाला दारूचा अड्डा बनविला कि काय असा प्रश्न निर्माण होतो बगीच्याकडे वेळीच लक्ष देऊन बगीच्याची निगा राखून बगिच्याचे सौंदर्य अबादित ठेवावे तसेच दारू पिणार्यांना वेळीच आळा घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.