सिंदेवाही जिल्हा”निर्मितीच्या मागणीसाठी शिवाजी चौक येथे लाक्षणिक उपोषण…

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

 

चंद्रपुर:

 सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समिती, सिंदेवाही च्या वतीने

 ” सिंदेवाही जिल्हा”

 चा निर्मिती च्या मागणीसाठी आज दिनांक २1 ऑगस्ट सोमवार ला शहरातील शिवाजी चौक येथे

लाक्षणिक उपोषण करण्यात आले। असून या उपोषणा मार्फत प्रमुख मागण्या करण्यात आले

१) सिंदेवाही तालुका अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, चिमूर मधून वगळण्यात यावा.

२) सिंदेवाहीचा समावेश नवनिर्मित जिल्ह्याच्या यादीत करण्यात यावा.

३) सर्व समावेशक तालुक्याचा व न्याय विभागणीचा विचार करून

मध्यवर्ती केंद्र असलेल्या सिंदेवाहीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा.

४) नवनिर्मित जिल्ह्यात चिमूर, नागभिड, सिंदेवाही, ब्रम्हपूरी, सावली व मुल या तालुक्यांचा समावेश व्हावा.

५) नवनिर्मित जिल्ह्यातील सर्व समाविष्ठ जनता, शासन व प्रशासन यांना सोयीचे व मध्यवर्ती ठिकाण म्हणून सिंदेवाहीचा विचार करण्यात यावा.

      या प्रमुख मागण्या करता लाक्षणिक उपोषण केले होते.यावेळी मनोहर पवार, रमाकांत लोधे, नागराज गेडाम,परसराम मेश्राम,  विद्या धुळेवार ,वंदना गजभिये, इंदुरकर, विलास गंडाटे, जयदेव श्रीरामे,भूषण,प्रकाश चेरकु, गजभिये,दीपक ,परसराम सलामे, दीपक बारसागडे ईत्यादी बहुसंख्य शहरातील नागरिक उपस्थित होते.