चातगाव येथे कॉन्व्हेंट चे उदघाट्न…

 

 भाविक करमनकर

धानोरा प्रतिनिधी

         दिनांक 17 आगस्ट 2023 ला हिरासुका बहुउद्देशीय आदिवासी संस्था चातगाव द्वारा संचालित उईके कॉन्व्हेंट चे उदघाट्न करण्यात आले. चातगाव परिसरातील बालकांना नर्सरी केजी एक केजी दोन याचे पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणार आहे. तसेच येथे प्रमुख पाच भाषेचे इंग्लिश , हिंदी, मराठी, गोंडी, तेलगू या भाषेचे महत्वपूर्ण ज्ञान देण्यात येणार आहे. उदघाट्न प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व सरपंच ग्रामपंचायत चातगाव गोपाल उईके तसेच संस्था सचिव व कॉन्व्हेंट चे प्रिन्सिपॉल प्रवीण मडावी, cfrmc सी एफ आर एम सी चे अध्यक्ष शिवशंकर मडावी, सुधाकर मडावी, प्रेमीला मडावी, शेषराव मसराम, पालक चंद्रशेखर पेंदाम व बालक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. अध्यक्ष पुढे म्हणाले कि परिसरात कॉन्व्हेंट नसल्याने बालकांना शैक्षणिक ओढ लागण्या करिता अडचण निर्माण होत होती. ती आता सुटलेली आहे. तरी पालकांनी आपले पाल्याचे कॉन्व्हेंट ला प्रवेश करून घेण्यासाठी विनंती केली. सूत्र संचालन शेषराव मेश्राम तर आभार प्रदर्शन कीर्ती उईके यांनी केले.