आळंदी येथे नागपंचमी निमित्त नागदेवतेचे पुजन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पुज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.वेद काळापासून चालत आलेला हा सण महत्वाचा मानला जात आहे.

        तिर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नाग देवताची सनई चौघड्याच्या सुरेल आवाजात मिरवणूक काढण्यात आली जून्या नगरपरिषदेच्या जवळील जागेत नागदेवतेची विधीवत पूजन माऊलींच्या सेवेत असणाऱ्या स्थानिक आळंदीकर मानकरी कुटुंबातील कुऱ्हाडे पाटील, घुंडरे पाटील आणि चिताळकर पाटील यांच्या कुटुंबातील महिलांनी केले. दुध, साखर, लाह्या, आघाडा दुर्वा वाहून नागदेवतेची पूजा करण्यात आली. नागदेवतेचे लक्ष्मी नारायण मंदिर, राम मंदिर, येथे पुजन करण्यात आले. यावेळी नागदेवतेचे माऊलींच्या मंदिरातील पालखी मंडपात आगमण झाले येथे नाग देवताची पुजा आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

        मंदिर समितीच्या वतीने माऊलींच्या सेवेत असणाऱ्या स्थानिक आळंदीकर मानकरी महीलांना नारळ प्रसाद देण्यात आला. यावेळी अंजना कुऱ्हाडे पाटील, रेखा कुऱ्हाडे पाटील, पुष्पा चिताळकर पाटील, ज्योती चिताळकर पाटील, सृष्टी घुंडरे पाटील, लक्ष्मी कुऱ्हाडे पाटील परिणिती कुऱ्हाडे तसेच माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे पाटील, विठ्ठल घुंडरे पाटील, भीमाशंकर वाघमारे, बारकू वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे उपस्थित होते.