बिग ब्रेकिंग न्युज… — टेक्निकल प्रॉब्लेम पुढे करीत तलाठी परिक्षेचा सकाळी ९ वाजता होणारा पेपर थांबवीला.. — परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या छाती धडधडू लागल्यात…

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

ब्रेकिंग न्यूज..

      तलाठी भरती संबंधाने आज सकाळी नऊ वाजता पुर्व सकाळच्या स्पिट अंतर्गत हजारो परिक्षार्थ विद्यार्थी पेपर देण्यासाठी गेले असता टेक्निकल प्रॉब्लेम पुढे करीत सकाळी नऊ वाजताचा पेपर थांबविण्यात आल्याने परिक्षार्थ विद्यार्थ्यांच्या छातीचे ठोके धडधडायला लागले असल्याचा गंभीर प्रकार नागपूर येथे उघडकीस आला आहे.

       परिक्षार्थी विद्यार्थी यांची तारांबड उडाल्याचे वास्तव्य वरील व्हिडीओ मध्ये प्रत्यक्ष बंद…

            महाराष्ट्र राज्यात तलाठी परिक्षेचा पेपर देण्यासाठी अनेक ठिकाणावरून लांबचा पल्ला गाठत परिक्षार्थ विद्यार्थी आपापल्या सेंटरवर पोहचले. 

          मात्र,सेंटर प्रमुखांनी टेक्निकल प्रॉब्लेम पुढे करीत सकाळी ९ वाजताचा होणारा पेपर सध्या थांबवीला आहे.तद्वतच आजचा पेपर उशिरा घेऊ असे सेंटर प्रमुखांकडून उपस्थित परिक्षार्थ विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. 

         परत दुसऱ्या स्पिटला तलाठी भरतीचा पेपर असताना पहिल्या स्पिटचा पेपर केव्हा होणार या विवंचनेत परिक्षार्थ विद्यार्थी आहेत आणि पेपर रद्द झालातर आमच्या भविष्याचे काय? या संबंधाने त्यांच्या छातीची धडकन वाढली असल्याचे विद्यार्थ्याच्या संपर्कावरुन लक्षात येते आहे.