एक दिवशीय तायक्वांदो प्रशिक्षण शिबिर सावित्रीबाई सेमी इंग्लिश शाळा, बाबूपेठ येथे पार पडली..

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

           तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट आणि मार्शल आर्ट व स्कूल गेम असोसिएशन च्या संयोगाने तायक्वांदो जिल्हा महासचिव व महाराष्ट्र बॉडी चे कार्यकारी सदस्य सतीश खेमस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर येथील शालेय विद्यार्थी यांना तायक्वांदो या शालेय खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.

       यात विद्यार्थी यांना या खेळातील महत्व ,याचे फायदे, सरकारी योजना व फिघाटींग चे प्रशिक्षण देण्यात आले. या सहकारी म्हणून प्रशिक्षक तुषार दुर्गे, अश्विन सिधमशेट्टीवार, आदर्श कापरकर, शुभम केडझरकर, सौरभ रामटेके, अनुष्का काळे, रोशनी छतारे, सुहानी शिरपूरकर याचे सहकार्य करून विध्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण दिले.

      या शिबिराच्या यशस्वीकरीता मास्टर निर्धार आसुटकर, मास्टर श्रावण शेट्टी, मास्टर नवनीत मून, रितेश पाथरडे व बाबूपेठ येथील शाखेचे प्रशिक्षक मास्टर जितेंद्र डोनेवार, डॉ. आंबेडकर महाविद्यालय शाखा ची लेडी प्रशिक्षक कु. अंजना शेट्टीयांनी परिश्रम घेतले.