दर्यापूर शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला,शहरात धुर व जंतू नाशक फवारणी करा… — सामाजिक कार्यकर्ते आतिष शिरभाते यांची मागणी..

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

     दर्यापूर शहरात डेंगू मलेरियाच्या रुग्णसंखेत झपाट्याने वाढ होण्याला सुरुवात झाली आहे तर बालकांचे रुग्णालय हे गच्च भरलेले दिसून येत आहेत शहरात दर्यापूर बनोसा बाभळी या भागात पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले आहेत तर नागरिकांनी आरक्षित केलेल्या जमिनीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांची व इतर वनस्पतींची वाढ झाली आहे या जागेत वराह आपला मुक्काम ठोकत आहेत तर मच्छरांची निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर व खुल्या जागेवर जंतुनाशकाची व धूर फवारणी पालिका प्रशासनाच्या वतीने करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

 पालिका प्रशासनाला लाखो रुपये कर स्वरूपात आर्थिक मिळकत मिळत असते त्या तुलनेत शहरात विकास कामे अद्यापही शुन्य दिसून येत आहेत. तर ठराविक प्रभागातच नगरसेवकांच्या कार्य तत्परतेमुळे विकास कामे झपाट्याने पूर्णत्वास गेली आहेत हे सत्य नाकारता येत नाही. परंतु बनोसा भाग हा उच्चवर्णीयांची ओळख असलेला भाग अद्यापही अविकसितच आहे. नालीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे तर काटेरी झुडपांची वाढ डुकरांचा मुक्त वावर होत आहे तरी पालिका मुख्याधिकारी यांनी या अति महत्त्वाकांक्षी प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून विकास कामे गतिमान करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आतिष शिरभाते यांनी केली आहे.