नीरा नरसिंहपुर दिनांक :21
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
अकलूज तालुका माळशिरस येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात गुरु -शिष्य कृतज्ञता सोहळा शिक्षक व गुरूंच्या उपस्थितीत करण्यात आला.महाविद्यालयाच्या 2001, 2002, 2003 व 2004 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सदर सोहळ्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सुमारे 210 विद्यार्थी सहभागी झाले. होते.सदर मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय बागडे,तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख हे होते.सदर मेळाव्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.शिवाजी नलवडे, शंकर बागडे,अल्ताफ आतार, सुधीर शेळके, गोपाळ साळुंखे, उज्वला जगदाळे,वैशाली तरसे, धनश्री ऊरणे,पराग चौधरी,गणेश सूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांना महाविद्यालयीन जीवनात घडवणाऱ्या प्राचार्य,प्राध्यापक, ग्रंथपाल,शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींचे आभार मानले व त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.
कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी काम करताना प्रत्येकाने प्रचंड जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे त्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही, तसेच प्रत्येक काम मनापासून व आनंदाने करावे तरच काम चांगले होते असे प्रतिपादन डॉक्टर आबासाहेब देशमुख यांनी केले.व्यवसाय,उद्योग, नोकरी,शेती करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्या अडचणींना न घाबरता त्या सोडवण्यासाठी आत्मविश्वासाने व आनंदाने सामोरे जाणे आवश्यक आहे असेही ते पुढे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना ,राष्ट्रीय सेवा योजना ,कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने संपन्न होत नाही असे मत केले.
अध्यक्ष भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर दत्तात्रेय बागडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विविध विषयातील रिसर्च सेंटर विविध विषयातील एम. ए. व एम. एस. सी.पदव्युत्तर अभ्यासक्रम इत्यादी विविध सुविधा व उपक्रमांची माहिती दिली.
शंकरराव मोहिते महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तसेच महिलासाठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय एक लाख रुपयाचा व विद्यापीठ स्तरीय दोन लाख रुपयांचा पुरस्कार व गौरव चिन्ह महाविद्यालयास देऊन शासनाने महाविद्यालयाचा गौरव केला आहे महाविद्यालय ,प्राचार्य ,प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांनाही उत्कृष्ट कामाबद्दल वेळोवेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासन यांनी अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे राष्ट्रीय छात्र सेनेने उत्कृष्ट कार्य करत अनेक सन्मान प्राप्त केले आहेत तसेच आज अखेर जवळपास 30 विद्यार्थी दिल्ली येथील आरडी परेडला जाऊन आले आहेत महाविद्यालयाचे अनेक खेळाडूंनी युनिव्हर्सिटी लेव्हल, स्टेट लेवल व नॅशनल लेव्हल वर उत्कृष्ट कामगिरी करून अनेक सुवर्णपदके, रोप्य पदके व कांस्यपदके प्राप्त केली आहेत तसेच विद्यापीठ युवा महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक वेळोवेळी मिळवले आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांनी गोल्डन बॉय ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केले आहेत एकंदरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून नावलौकिक कमावला आहे आज महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने नाव कमवत आहे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.कृतज्ञता समारंभा नंतर सहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला व त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट ग्रंथालय, मुला मुलीसाठी स्वतंत्र वस्तीग्रह, ऑनलाइन ऍडमिशन प्रोसेस, अद्यावत जिम, भव्य क्रीडांगण व इंडोर स्टेडियम इत्यादी सुविधा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे माजी अध्यक्ष श्री जयसिंग मोहिते पाटील व विद्यमान अध्यक्ष श्री संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच संस्थेच्या संचालिका माननीय स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात निर्माण करण्यात आल्या आहेत याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. तसेच यावेळी शंकराव मोहिते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड उपस्थित होते.
श्री.हेमंत बरडे यांनी सर्वांचे स्वागत आणि आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा मूळ हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी विद्यार्थी श्री.शहाजी दुपडे यांनी तर आभार प्रदर्शन लीना बरखडे केले.सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी हेमा सुर्वे, अनुसया मगर,आण्णासाहेब शिंदे,आण्णासाहेब मगर, पितांबर मिसाळ, मल्हारी मगर, अश्वराज वाघ, सुखदेव घुले,अरुण गुजर,आनंदराव मांडवे, सुनील कुदळे,दत्तात्रेय भोसले,जयकुमार जाधव, हरीश टिक,धनंजय जाधव, ताज खान पठाण,राहुल नवले, विजय वाळेकर,दिलीप खिचडे,नाना साळुंखे,संतोष साठे,हनुमंत भित्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.