तेंदूपत्ता तोडाईसाठी गेलेल्या महिलेची बैलगाडी पलटी झाल्याने हात मोडला… — माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून महिलेला आर्थिक मदत…

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक      

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण भागात सद्या सगळीकडे तेंदूपत्ता संकलन सुरु आहे.अहेरी तालुक्यातील पुसूकपल्ली येथेसुद्धा तेंदूपत्ता संकलन सुरू आहे.पुसुकपल्ली येथील लिंगूबाई चौधरी यांनी काल बैलगाडीने जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडून परत बैलगाडीनी घरी परत येत असताना बैलगाडी पलटी होऊन लिंगूबाई गंभीर जखमीं होऊन यात त्यांच्या हात मोडला.या घटनेची माहिती पुसूकपल्ली येथील कार्यकर्त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना दिली असता त्यांनी माहिती मिळताच क्षणाचेही विलंब न करता जखमी झालेल्या लिंगूबाई चौधरी यांच्या घरी भेट देऊन त्यांना औषध व उपचाराकरिता आर्थिक मदत दिली व त्यांच्या तब्यतीची आस्थेने विचारपूस केली.

              पुसुकपल्ली येथील जख्मी महिलेला आर्थिक मदत करतांना माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्यासोबत अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,जिल्हा परिषद शाळा समिती पुसुकपल्ली अध्यक्ष रामदास चौधरी, रमेश डोके,रवी भोयर,परदेशी डोके,रामलू चौधरी,रामलु भोयर,प्रभाकर चौधरी, सत्यवान जवादे,बाबुराव चौधरी,अशोक चौधरी,शामराव कुळमेथे,विलास जवादे,मलेश चौधरी,व्येंकटेश चौधरी, संतोष येल्लुर,उमेश डोके,कृष्णा कांत,झनकापुरे श्रिनिवास,भोयर रमेश, गणपती भोयर, विनोद रामटेके,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.