गुगामल वन्यजीव विभागाअंतर्गत चिखलदरा परिक्षेत्रामध्ये चिखलदरा वन विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न…

दखल न्युज भारत चिखलदरा

तालुका प्रतीनीधी-:अबोदनगो चव्हाण

 

चिखलदरा-:

दिनांक 20.4.23 रोजी चिखलदरा परिक्षेत्रामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले सदर परिषदेकरिता चिखलदरा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री मनोज शर्माजी, सचिव मारोती पाटणकर प्रसिद्धी प्रमुख मोहसीन शेख श्री मोहन गायन व वरीष्ठ पत्रकार मोहम्मद आश्रफ साहेब व चांदमी साहेब , अबोदनगो चौहान ,तसेच इतर पत्रकार उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मयुर भैलुमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिखलदरा वन्यजीव यांनी केले तसेच कार्यक्रमाची रूपरेषा मा ठिगळे साहेब सहाय्यक वनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग यांनी स्पष्ट केली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सुमंत सोळंकी उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यांनी सर्व पत्रकार यांना संबोधित करून गुगामल वन्यजीव विभाग अंतर्गत वन्यजीवकरिता व पर्यंटनाकरिता झालेल्या व भविष्यात होणाऱ्या कामांविषयी पत्रकारांशी संवाद साधला सदर परिषदेमध्ये विविध शासनाच्या कामांविषयी, चिखलदरा पर्यटन विषयी, वन्यजीव संरक्षण व संवर्धन विषय चर्चा होऊन संध्याकाळी सर्व पत्रकारांसोबत चूरणी वैराट जंगल सफारी करण्यात येऊन विविध कामाची पाहणी करण्यात आली तसेच जंगल मैं मोर नाच्या किसने देखा या उक्ती प्रमाणे वन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक पणे वन्यजीव करिता केलेल्या कामाची माहिती पत्रकार बंधू यांच्या मार्फत सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार बंधूने करावे असे या वेळेस नमूद करण्यात आले.