अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, कोकर्डा येथील घटना, खल्लार पोलिसांची कारवाई….

 

युवराज डोंगरे 

जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोकर्डा येथील भुलेश्वरी नदीच्या पुलावर भर दुपारी अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खल्लार पोलिसांनी दि 20 एप्रिलला दुपारी 2 ते 2:45 वाजताच्या दरम्यान पकडला असून याप्रकरणी दोघांवर खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 20 एप्रिलला खल्लार पोलिस हे कोकर्डा बिटमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना दुपारच्या सुमारास कोकर्डा येथील भुलेश्वरी नदीच्या पुलावर विना नंबरचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अवैध रेतीची वाहतूक करतांना आढळून आला.

पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीची झडती घेतली असता ट्रॉलीत 4 हजार रुपये किंमतीची अवैध रेती आढळली याप्रकरणी खल्लार पोलिसात ट्रॅक्टर चालक प्रविण देविदास गवई(39)रा डोंबाळा व ट्रॅक्टर मालक सुरेश शामराव पानझाडे(54) रा कोकर्डा यांच्या विरुध्द खल्लार ठाण्यात अप न 101/23 ,कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल केला असून हि कारवाई ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर घुगे, परेश श्रीराव, शरद डहाके, गजानन ढगे यांनी केली आहे.