शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना… — अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

गडचिरोली जिल्हा

कूरखेडा-

        शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षका विरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याचा विविध कलमान्वये काल सांयकाळी उशीरापर्यंत कूरखेडा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला.

              आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे वय ४७ असे असून तो तालूक्यातीलच एका जि प उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. शाळेतीलच एका अल्पवयीन मूलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिचा शरीराचा मूका घेणे,चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत काल मूलीचे पालकांनी पिडित मुलगी व  कूरखेडा पोलीस स्टेशन येथे पोहचत तक्रार दाखल केली.

         या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि ३५४(अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला या बाबत माहिती होताच आरोपी शिक्षक फरार झाल्याचे माहिती आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत.