आळंदी शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी संगिता पफाळ यांची नियुक्ती…

दिनेश कुऱ्हाडे 

  प्रतिनिधी

आळंदी : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख डॉ.राम गावडे यांच्या सोबत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या आळंदीच्या शिवसेना महीला विभागप्रमुख संगिता पफाळ यांची आळंदी शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

माजी सभापती तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कल्पनाताई गवारी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच शिवसेनेच्या माजी महीला शहरप्रमुख मंगल हुंडारे यांची भाजप महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदी, तसेच‌ मीनाताई चव्हाण यांची आळंदी शहर भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी आणि अनिता सातकर यांची आळंदी शहर भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी भाजपचे नेते डॉ.राम गावडे, भाजप तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, शहराध्यक्ष किरण येळवंडे, गणेश सांडभोर, पाटीलबुवा गवारी, अमोल विरकर, ज्ञानेश्वर बनसोडे उपस्थित होते.