मोठ्या प्रमाणात पाऊस पडून दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळ सुतार वस्ती यांचे गणरायाला साकडे….

 

   बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे श्रीराम नगर येथील सुतार वस्ती या ठिकाणी. मंगलमय वातावरणात मंगळवार दि.19 रोजी पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन होऊन गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणरायाचे पूजन करीत सर्व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील भाविक भक्त बांधव व ग्रामस्थ यांनी प्रार्थना व गणरायाची महाआरती केली. या दहा दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून महाराष्ट्रावरचे दुष्काळाचे सावट ,संकट दूर व्हावे.

        पत्रकार संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार यांचे गणरायाला महाआरती प्रसंगी मागणी ,मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळच्या वतीने श्रीराम नगर येथील सुतार वस्ती यांनी पत्रकार बाळासाहेब सुतार यांच्या निवासस्थानी सर्व ग्रामस्थ व कुटुंबासमवेत गणरायाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

          यावेळी मारुती सुतार, पोपट ‘सुतार , बाळासाहेब सुतार ,राजेंद्र सुतार , शिवाजी राजपूत , तानाजी राजपूत , सुरज सुतार ,अक्षय सुतार ,मयूर सुतार ,विष्णू सुतार ,सौरभ सुतार , शुभम चव्हाण ,सोनु रजपूत , सौदागर सिरसागर ,सह आनेक भाविक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

         सर्व कुटुंबामध्ये गणरायांचे उस्फूर्त स्वागत केले जाते तसेच हा उत्सव देशभर आनंदाने साजरा केला जात आहे. गणरायाचे एकरूप म्हणजे विघ्नहर्ता आसून महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे ते दूर करण्यासाठी एवढ्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून हे संकट टळू दे आशी प्रार्थना मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळ सुतार वस्ती यांच्या वतीने या वेळी केली. महाआरतीनंतर सर्वांना गोड मोदक व साखर प्रसाद म्हणून देण्यात आली.

फोटो :-पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे बाळासाहेब सुतार यांच्या निवासस्थानी गणरायाची आरती करीत आसताना भाविक भक्त.