मोठे मासे जाळ्यात केव्हा लटकणार? — इंग्लिश, देशी, विदेशी, मोह दारूच्या गैर व्यवसायातंर्गत आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत?….. — “अहो! लहान माशांना तर कुणीही गिळंकृत करतय?….पण मद्दसम्राटाचं काय? — गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देणार काय?

 

प्रितम जनबंधू 

 संपादक 

           आदिवासी बाहुल्य गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दारुच्या नशेत गुंग करु अप्रगत करुन ठेवण्याचा विळा कुणी उचलाय? व ठेका कुणी घेतलाय? हे गुलदस्त्यातील कोडे असले तरी समाजातील मुळ घटकांना बरबाद करणेवाल्या अवैध व्यवसायिकाकडे दुर्लक्ष करायचं यासाठी प्रशासकीय यंत्रणा आहे काय?हा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.

          याचबरोबर गडचिरोली जिल्हातंर्गत आरमोरी तालुक्यात दारुचा पुरवठा करणारा मोठा डिलर, दारू विक्री करणारे मोठे अवैध व्यवसायिक हे संबंधित यंत्रणेच्या नजरेआड कसे काय आहेत? हेच कळायला मार्ग नाही.

           शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी शहरात दिवसेंदिवस देशी वीदेशी इंग्लिश व मोहाच्या दारुचा उहापोह फार मोठ्या प्रमाणावर होतांना दिसुन येत आहे.

           आरमोरी तालुकातंर्गत दारुच्या महा व्यवसायात युवावर्ग व्यसनाधीन बनत चालला आहे. दारुच्या व्यसनामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे पावलोपावली जाणवत असुन अनेक तळीरामांना आपला जीव गमावावा लागला असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. 

        शिवाय दारूमुळे अनेक परिवाराची वाताहात झाली असल्याचे विदारक चित्र निदर्शनास येत आहे. 

         आरमोरी शहरातील चौकाचौकात दारुविक्री अगदीच जोमात व खुलेआम होत असल्याने सदर परिसरात सायंकाळच्या सुमारास तडीरामाची तोबा गर्दी बघायला मिळत असते.

         यामुळे सदर परीसरातील शांतता व सुववस्था भंग होत चालली आहे. संबधीत स्थानीक प्रशासन मात्र मुळावर घाव घालायचे सोडुन फाद्यावर घाव घालत असल्याचे दिसून येत आहे.

           तात्पर्य असे की, चिल्लर विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र मुख्य दारुमाफीया तर मोकाट वावरतांना दिसुन येत आहेत. परिणामी दारुविक्रेते मालामाल होत असुन पिणारे मात्र कंगाल होत आहेत. 

         त्यामुळे सदर दारु माफीयावर कारवाई करणार कोण?, जिल्हाबंदी असताना माल येतो कुठुन?, आणतोय कोण?, आरमोरी नगरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दारुचा पुरवठा सुरळीत होण्यास जबाबदार कोण? आणि संबधीत स्थानीक प्रशासन निद्रावस्थेत आहे असे समजायचे काय? अशी असंख्य प्रश्न जनसामान्यांना अस्वस्थ करून सोडत आहेत.           

      आरमोरी शहरात मोठ्या प्रमाणातील अवैध दारु विक्रीचे गांभीर्य लक्षात घेता संबधीत जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यासाठी दक्ष व्हावे अशी जनसामान्यांची त्यांना आर्त हाक आहे.

         मात्र जिल्हा प्रशासन सतर्क व दक्ष होत अवैध दारु व्यवसायिकांवर कारवाई करणार काय? याकडे आरमोरी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

           गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बाहुल्य नागरिकांना व्यसनाधीन व्यवस्थेच्या गर्तेत लोटून त्यांना व्यसनाधीनतेच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाने मारायचे ठरवीले आहे की काय? हा पोटतिडकीचा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी…

                   क्रमशः पुढील भागात…..