युवराज डोंगरे
उपसंपादक
डॉ.ठोकळ डेंटल हॉस्पिटल, दर्यापूर येथे नुकतीच दर्यापूर येथिल एका इसमाच्या जबड्यातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया अमरावती येथिल प्रख्यात डेंटल सर्जन डॉ.राहुल देशमुख व डॉ.आकाश ठोकळ यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.प्रसंगी बालाजी हॉस्पिटल, दर्यापूर येथिल डॉ.तिरुपती राठोड अकोट येथिल भूलतज्ज्ञ डॉ.चैतन्य अंबाळकर यांची उपस्थिती होती.
यापूर्वी सुध्दा अशा शस्त्रक्रिया दवाखान्यात झाल्या आहेत पण ही शस्त्रक्रिया आजपर्यंतची सगळ्यात मोठी ठरली आहे. यानंतर रुग्णांना अमरावती,अकोला अशा मोठ्याशहरांमध्ये जाण्याची गरज नाही. सर्व सुविधा येथेच उपलब्ध आहेत. अशी माहिती डॉ.ठोकळ यांनी दिली.


