युवराज डोंगरे
उपसंपादक
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सन २०२३-२४ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये खल्लार नजिकच्या गट ग्रामपंचायत महिमापूरला (मिर्झापूर) जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळाला.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,खासदार अनिल बोन्डे, आमदार संजय खोडके, प्रविण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखेडे, गजानन लवटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा, महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा, माजी पालकमंत्री प्रविण पोटे, नितीन धांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्या उपस्थितीत गट ग्रामपंचायत महिमापूरला जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन ६ लक्ष धनादेश तसेच गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पुरस्कार घेण्याकरिता सरपंच सुहास साहेबराव वाटाणे, दर्यापूर पंचायत समितीचे बि.डी.ओ.चंद्रशेखर ढवक, विस्तार अधिकारी संदीप देशमुख, चांदुरकर, ग्रामपंचायत अधिकारी सचिन कोरडे, संजय चव्हाण, सतिश पाटील, उपसरपंच राजेंद्र थोरात, सदस्य सौ योगिता काळे, सौ सुनिता कडू, सौ.राणीताई पवार, गणेश नितनवरे, हरीश घोंगडे तसेच या अभियानात सहकार्य करणारे साहेबराव पाटील वाटाणे, बाळकृष्ण भिसे, प्रेमदास काळे, गजानन डांगे, प्रभाकर वाटाणे, मंगेश पवार, संजय कडू, गजानन काळे, जनार्दन थोरात, मंगेश राऊत, योगेश काळे, अनुप कथे आदी उपस्थित होते.



