सुयोग गोरले यांना 2023 चा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार जाहीर… — महाराष्ट्र मधून 575 पत्रकार मधून उत्कृष्ट पत्रकार म्हणून निवड… — अनेक मान्यवर च्या हस्ते देण्यात येणार उत्कृष्ट पत्रकार व समाजसेवक ला कृषिरत्न पुरस्कार…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

           माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठान चा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार उत्कृष्ट पत्रकार व जीवन आधार संस्थेचे सहसचिव सुयोग गोरले यांना जाहीर झाला आहे. सेंद्रीय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग विभागांतर्गत हा पुरस्कार मिळाला आहे. चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील दुष्काळी भागा अल्पभूधारक शेतकरी व अतिवृष्टी मध्ये सापडलेल्या शेतकरी , घर कोसडलेला शेतकरी परिवार अडचणीत येत असल्याने त्या शेतकरी यांच्या भावना त्याच्या शेतामध्ये जाऊन स्वतः आपल्या लेखणी मांडून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत कोणत्या माध्यमातून मिळेल हे प्रयत्न नेहमी करत असताना आपल्या माध्यमातून काय देता येईल हे प्रयत्न करत असताना आपल्या पत्रकाचे मधून आपल्याला समाजामध्ये काहीतरी दिने लागते या भावनेने गोरगरीब अपंग अनाथ बेघर , आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांना आपल्या माध्यमातून मदत करण्याचे कार्य सुयोग गोरले करत असतो पत्रकारिता करत असताना भर पावसामध्ये शेतकऱ्यांची भावना शेतामध्ये जाणून घेण्याकरता प्रयत्न करत असतो व आपल्या लेखणी मधून शासनापासून मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील करत असतो हे करत असताना जीवन आधार संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट समाज सेवक म्हणून गोर गरीब परिवार ला मदत करणे ,अपंग व्यति ला सायकल वाटप करणे बेघर व्यति ला किराणा किट , कपडे वाटप करणे असे अनेक उपक्रम राबिवीत असतो त्या निमित्ताने राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार गेल्या १६ वर्षांपासून हे प्रतिष्ठान शेतकरी, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट समाजसेवक , शेतमजूर, शेती निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्या कार्याचा गौरव करीत आहे, खासदार स्व. राजीव सातव यांनी ही संकल्पना प्रथम अमलात आणली. अमरावती जिल्ह्यातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा पौर्णिमा ताई सवाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घोषणा केली आहे. समितीमध्ये डॉ. दिलीप काळे अविनाश पांडे , अनील ठाकरे भैय्यासाहेब निचळ, प्रा. अमर तायडे, प्रा. हेमंत डिके, मिलिंद फाळके, जावेद खान, नामदेव वैद्य, जयसिंग राव देशमुख आदींचा समावेश आहे. २१ मे ते २८ मे या कालावधीत सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा त्या त्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी, महिला शेतकरी, फळबाग उत्पादक, गाव कारभारी सरपंच, उत्कृष्ट बैलजोडी मालक, कृषीवैज्ञानिक, पशुसंवर्धन,पशु वैद्यकीय संशोधन, उत्कृष्ट दूध उत्पादक, कृषी पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी सांगितले. सदर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये डॉ. श्याम देशमुख (पशुवैद्यकीय संशोधन) राणीताई भांडारे (गावकारभारी सरपंच), प्रवीण बारी( फळबागायतदार ), सुयोग गोरले (कृषी पत्रकारिता), अनुप बगाडे ( प्रयोगशील शेतकरी) , संगीता ताई दुधे( उत्कृष्ट महिला शेतकरी), विजय भुयार ( उत्कृष्ट दूध उत्पादक), मे. अजिंक्यतारा शेतकरी उत्पादक कंपनी चा समावेश आहे. सदर पुरस्कार 26 मे रोजी संत गाडगेबाबा आश्रम नागरवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थित सुयोग गोरले यांना प्रदान करण्यात येणार आहे.