उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांचे दुचाकी वाहन चालकांसाठी सूचना…

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.20: मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 सह 194 (ड) नुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्या मागे बसुन प्रवासकरणाऱ्या चार वर्षा वरिल सर्व व्यक्तीने भारत मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार ” संरक्षक शिरस्त्राण”(Helmet) वापरणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 कलम 250 नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यक्तीरिक्त इतर रस्त्यांवर 50 क्युबिक सेंटिमीटर पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन असलेले मोपेड, व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्तीस मोटार वाहन कायदा, 1988 कलम 129 च्या तरतुदीपासुन अपवाद करण्यात आलेला आहे. मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 194 (ड) अन्वये वाहन धारकाने नियम 129 चे उल्लंघन केल्यास तो स्वत: तसेच ज्या आस्थापनेमधील जागेवर गुन्हा घडला आहे ती आस्थापना प्रमुख सुध्दा उपरोक्त उल्लंघणास जबाबदार राहतील. गडचिरोली जिल्हयात होणाऱ्या अपघातात मोटार सायकल चे अपघात व त्यात मृत्यु होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहेत. गडचिरोली जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालीका, नगरपरिषद, व सर्व शासकीय आस्थापना तसेच खाजगी आस्थापने यांनी त्यांच्या आस्थापनेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसुन येणाऱ्या व्यक्तीस ” संरक्षक शिरसत्राण” (Helmet) परिधान करणे बंधनकारक असुन त्याची त्वरीत प्रभावाने अमंलबजावणी सुरु करण्यात येत आहे. सदर आदेशान्वये गडचिरोली जिल्हयाअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालीका, नगरपरिषद, सर्व शासकीय आस्थापना, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापने या आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी तसेच वरील आस्थापनेत येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना लागु राहिल. संरक्षक शिरस्त्राण (हेलमेट) परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्ती विरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 129/177, 250 (1) नुसार तसेच कलम 194 (3) अन्वये संबंधीत आस्थापना प्रमुख यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यांचे कडुन रु.1000/- दंड तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती 3 महिण्यासाठी निलंबित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली विजय चव्हाण यांनी कळविले आहे.