मुनघाटे महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एक दिवशीय कार्यशाळा संपन्न..

धानोरा /भाविक करमनकर 

 

स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे दिनांक 17/04/2023 ला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मानव्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ चंद्रमौली सर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा डॉ आर पी किरमीरे होते यांच्यासह मंचवार प्रा डॉ वाघ प्रा डॉ लांजेवार प्रा डॉ वीणा जंमबेवार उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मानव्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ चंद्रमौली सर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वरूप ध्येयधोरणे त्याची भूमिका संधी आणि आव्हान या संदर्भाने नवीन शैक्षणिक धोरण रोजगारभिमुख असणार यावर त्यांनी विस्तृत असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ आर पी किरमीरे सर यांनी यावेळी नवीन शैक्षणिक धोरण यावर विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ गणेश चुदरी तर आभार प्रा डॉ प्रियंका पठाडे यांनी केले महाविद्यालयातील प्रा डॉ डी बी झाडे प्रा डॉ मुरकुटे प्रा तोंडरे प्रा पुण्यप्रेड्डीवार प्रा भैसारे प्रा वटक प्रा खोब्रागडे प्रा आवारी प्रा रणदिवे सर उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.