‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन… — सुट्टीच्या दिवसात प्रेरक गोष्टी मुलांच्या भेटीला ….!

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागाच्या , प्रकाश बोकील लिखित ‘गोष्टी,गोष्टी,पन्नास गोष्टी !’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार,दि २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ .30 वाजता होणार आहे.विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री डॉ निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ होणार आहे.विमलाबाई गरवारे प्रशाला(डेक्कन कॉर्नर) येथे हा कार्यक्रम होणार आहे. 

         विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट,सचिव सुधीर जोगळेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शंभर प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी या पुस्तकात एकत्र करण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवसात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी हे गोष्टींचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.वाचनातून मूल्य शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे.