महापुरुषांच्या जिवनातील मुख्य प्रेरणा शोधल्या पाहिजे.:- डॉ. राजेश मिरगे..

 

युवराज डोंगरे/खल्लार

       उपसंपादक 

          डॉ.पंजाबराव देशमुख हे कर्ते समाज सुधारक,सामाजिक क्रांतीचे अग्रणी धर्मज्ञानी व समाज सुधारक होते.सत्तेच्या बाहेर जाऊन समाजासाठी काम करण्याची भूमिका त्यांची होती.

            आपल्या घरची 105 एकर जमिन गहाण ठेवून दहा हजाराचे कर्ज घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी आपला प्रबंध सादर केला.यावरून सामान्य माणसाला शिक्षणासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात,हे त्यांनी ओळखले होते. 

             बहुजन वर्गाने ज्ञानसंपन्न व जलसंपन्न झाले पाहिजे.तसेच तरुणांनी दिसण्यापेक्षा असण्यावर लक्ष केंद्रित करून ज्ञान संपादित केले पाहिजे अशी भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांची होती असे डॉ.राजेश मिरगे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भाऊसाहेबांचे कृषिविषयक धोरण,शैक्षणिक धोरण, सामाजिक कार्य तसेच क्रीडा विषयक धोरण स्पष्ट केले.

           अत्यंत कठीण काळात 1931 मध्ये श्री.शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाची व्यवस्था करून दिली.भाऊ साहेबांचे विचार हे सामान्य जनता व तरुण वर्गापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. मिरगे यांनी केले.

           या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

          छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा व श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शतक उत्तर रोप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त आसेगाव पूर्णा येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे उपस्थित होते.प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजेश मिरगे,तसेच श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शशांक देशमुख,श्री. मंगेश जुनघरे.श्री.अढाऊ उपस्थित होते. 

            या कार्यक्रमाचे संचालन डॉ.भारत कल्याणकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.प्रविण सदार यांनी केले.आभार डॉ रविंद्र इचे यांनी मानले.या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागामार्फत करण्यात आले होते.