स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेताना भूषण वाटते.:- चरणदास इंगोले… — असदपुर येथे अनेकांचा पीआरपीत प्रवेश..

 

 युवराज डोंगरे/खल्लार

         महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार अंगीकारून राजकीय पातळीवर काम करत असताना स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेत असताना मोठे भूषण वाटते.असे सांगून डॉ.बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार हाच खऱ्या अर्थाने आपला राजकीय आधार होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक आंबेडकरी माणसांनी रिपब्लिकनवादी बनावे असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी असदपूर येथे समाजबांधवांशी बोलताना केले.

           पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्ष बांधणीच्या दृष्टीने अमरावती जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या गाव भेट अभियानांतर्गत दिनांक 17 ऑगस्ट 2023 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता अचलपूर तालुक्यातील असदपूर या गावी भेट दिली असता समाजसेवक

 प्रमोदराव नितनवरे यांचे निवासस्थानी घेतल्या गेलेल्या बैठकी मध्ये चरणदास इंगोले यांनी वरील विचार मांडले.

         यावेळी गावातील अनेक समाज बांधवांनी जगप्रसिद्ध लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून त्यांच्या नेतृत्वतील पीपल्स रिपब्लिकन पार्टीत काम करण्याचा अनेकांनी मनोदय व्यक्त करून पक्षात प्रवेश घेतला असून लवकरच पीपल्स रिपब्लिकन पक्षाची शाखा गठीत करून समारंभपूर्वक चरणदास इंगोले यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन केल्या जाणार असल्याचे प्रवेश घेणाऱ्यांपैकी प्रमुख समाजसेवक प्रमोदराव नितनवरे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

            बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष जानराव वाटाणे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णराव नितनवरे, नारायण नितनवरे ,रामकृष्ण नितनवरे ,जगजीवन नितनवरे, प्रमोद नितनवरे ,आशिष नितनवरे, प्रेमदास नितनवरे, अमोल मोहोड ,पंजाबराव नितनवरे ,यांचेसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.