नियती फौंडेशनच्या “सन्मान कर्तृत्वाचा २०२३” पुरस्काराचे वितरण… — सुनील गोडसे, कैलास केंद्रे, डॉ.उर्मिला शिंदे, ज्ञानेश्वर वीर यांचा गौरव…

दिनेश कुऱ्हाडे

प्रतिनिधी

आळंदी : येथील नियती फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनाच्यानिमित्त आळंदी कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मंडलाधिकारी स्मिता जोशी, प्राचार्य डॉ.रवींद्र चिंतामणी, कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना नियती फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा २०२३ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

आळंदी नगरपरिषदचे माजी सभापती डी.डि.भोसले पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी नियती फौंडेशनच्या अध्यक्षा‌ नियतीताई शिंदे, विकास शिंदे, कविता भीलछीम, रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे, विठ्ठल शिंदे, डॉ.सुनिल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नियती फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमीच उत्कृष्ट कार्य करीत आहेत हि संस्था नेहमी समाजोपयोगी काम करत असते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनाच्यानिमित्त आळंदी कार्यक्षेत्रातील प्रशासकीय व तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान कर्तृत्वाचा २०२३ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे असे नियती फौंडेशनचे अध्यक्षा नियती शिंदे यांनी सांगितले आहे.