शिराळा गावचे ग्रामदैवत शंभू महादेव यांच्या मुख्य यात्रेला शुक्रवार दिनांक 19 एप्रिल पासून प्रारंभ…. — दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 20 एप्रिल रोजी शंभू महादेवाचा मानाचा छबिना.. — गावातून ग्राम प्रदक्षिणा फटाक्यांच्या व वाद्यांच्या आतिश बाजीत काढण्यात येणार…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

          सालाबाद प्रमाणे शिराळा तालुका परांडा गावचे ग्रामदैवत शंभू महादेव देवस्थान यांचा मुख्य यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक 19/ 4 /2024 पासून प्रारंभ होणार.

         यासाठी शिराळा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, व शिराळा गावचे ग्रामस्थ आणि भावी भक्त, तरुण कार्यकर्ते यांच्या वतीने यात्रा उत्सवानिमित्त आलेल्या भाविक भक्तसाठी देवस्थानचा परिसर व संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले.

           पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच यात्रा उत्सवासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद हा शिराळा गावच्या वतीने सालाबाद प्रमाणे देण्यात येत असतो. संपूर्ण व्यवस्था यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे. शिराळा गाव हे धार्मिक क्षेत्रात आग्रेसर व गावची प्रसिद्धी ओळख हि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे.

          म्हणूनच पहिल्या दिवशी ह भ प संतोष महाराज लहाने आळंदीकर यांची कीर्तन सेवा ही शंभू महादेवाच्या प्रांगणात रात्री 9 ते 11 या वेळेत होणार आहे. यासाठी अनेक भागाभागातून ग्रामस्थ व भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

            तसेच दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 20/ 4 /2024 रोजी संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत शंभू महादेवाचा छबिना घेऊन संपूर्ण गाव प्रदक्षिणा व शोभेची दारूकाम, हलगी, ढोल, ताशांच्या आवाजात शंभू महादेवाचा छबिना वाजत गाजत मिरवणूक व संपूर्ण गावांमधून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येणार तर त्याच दिवशी कलगीतुरा कार्यक्रम शाहीरांची गाणी होणार आहेत. याही कार्यक्रमाला हजाराच्या संख्येने ग्रामस्थ आणि भाविकांची हजेरी आसणार आहे.

          तसेच तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक 21/ 4/ 2024 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरवण्यात येणार आहे. या निकाली कुस्त्याच्या मैदानासाठी राज्यातून पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, आशा आनेक जिल्ह्यातून नामांकित पैलवान व कुस्ती शौकिन हजारो संख्येने पैलवान उपस्थित होणार आसल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले तर त्याच दिवशी शिवशाहीर यांचा पोवाडा गायन ग्रामस्थांच्या व भाविकांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेला असून या नंतर शंभू महादेव यात्रेची सांगता होईल. 

चौकट 

          सोमवार दिनांक 29 /4 /2024 रोजी संध्याकाळी ह भ प इंदुरीकर महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न होणार.

       याही कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भावीक व ग्रामस्थ उपस्थितीत राहणार आहेत.