उभ्या ट्रकला स्विफ्ट डिझायरने दिली धडक.. — एक गंभीर..

 

रुपेश बारापात्रे

शहर प्रतिनिधि

 

आरमोरी –

आरमोरी गडचिरोली रोड वरील पेट्रोल पंप जवळ उभ्या ट्रकला स्विफ्टफ्ट डिझायर ने धडक दिल्याने एक गंभीर असल्याचे समजते.

सविस्तर वृत्त असे की, काल पासून मोठ्या प्रमाणत गोसे धरणच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वैनगंगा नदीला पुर आला आहे. गडचिरोली जाणाऱ्या वाहनाची रांग च रांग गाढवी नदीपासून आरमोरी शहर पर्यंत आहे अश्यातच भारत पेट्रोलियम जवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागेहून धडक दिल्याने चालक गंभीर असून सदर व्यक्ती चामोर्शी येथील रहिवाशी असून सोमनकर असे नाव असल्याचे समजते.

ब्रम्हपुरी वरून येऊन सरळ मार्गे चामॉर्शी ला जात असताना ही घटना घडली असून आरमोरी येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घटना स्थळी ट्राफिक हवालदार पठाण अधिक तपास करीत आहेत.