संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी ॲड.विकास ढगे पाटील यांची निवड….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून ते ३ जुलै या कालावधीत संपन्न होणार असून यावर्षीच्या पालखी सोहळा प्रमुखपदी ॲड.विकास ढगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांना नुकतीच मुदतवाढ मिळाल्यानंतर लगेचच ढगे पाटील यांची पालखी सोहळा प्रमुखपदी निवड झाली आहे, पुणे वकील संघटनेचे माजी अध्यक्ष असलेले ॲड.विकास ढगे पाटील यापूर्वी दोन वेळा आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त व तीन वेळा पालखी सोहळाप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी पाडल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले आहे.

        संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतून मार्गस्थ होऊन पंढरपूर मध्ये दाखल होईपर्यंत व त्यानंतर पंढरपूर येथून पालखी सोहळा आळंदीत येईपर्यंत सोहळ्यासोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची, सुरक्षतेची काळजी घेऊन संपूर्ण पालखी सोहळा वैभवात, आनंदात, शिस्तीत व भक्तिमय जल्लोषात पार पाडण्यासाठी आवश्यकत्या सर्व उपाययोजना प्रशासनाबरोबर समन्वय ठेवून प्रत्येक वारकऱ्याला सोयी सुविधा कशा मिळतील याबाबतीत काटेकोर नियोजन केले जाईल.असे पालखी सोहळा प्रमुख ॲड.विकास ढगे पाटील यांनी यावेळी सांगितले.