शासकीय योजनाची जत्रा नागरिकांच्या उपयोगाची.:-आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन… — भामरागड येथे शासकीय योजनेची भव्य जत्रा…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

भामरागड :- महाराजस्व अभियानाची शासकीय योजनाची जत्रा अर्थात शासन आपल्या दारी ही शासनाची अभिनव उपक्रम व योजना नागरिकांच्या अत्यंत उपयोगाची असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

     ते बुधवार 17 मे रोजी स्थानिक फॉरेस्ट ग्राऊंडवर उदघाटनीय स्थानावरुन बोलत होते. 

     यावेळी अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी(भा.प्र.से.) शुभम गुप्ता होते. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, तहसिलदार अनमोल कांबळे, संवर्ग विकास अधिकारी स्वप्निल मकदूम, धोड़राज ग्रा.पंचायतीचे सरपंच सोनाली पोटामी, कोठि ग्रा.पंचायतीचे सरपंच भाग्यश्री लेकामी, नायब तहसिलदार प्रकाश पुप्पलवार, आदिवासी सेवक सबर बेग मोगल, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार आदी मान्यवर उपस्थित होते.

     पुढे उदघाटनीय स्थानावरुन आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले कि, शासकीय योजना व शासनाचे नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रमे, सोयी सवलत्या यापासुन बरेच नागरिक अनभिज्ञ असतात, परंतु ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांना वेळीच सर्व सोयी सवलत्या अवगत होतात तसेच महत्त्वपूर्ण प्रमानपत्रे व दस्तावेज वेळीच उपलब्ध होतात अर्थात शासकीय योजनाची जत्रा नागरिकांच्या अत्यंत उपयोगाची असल्याचे म्हणत जिल्हा व तालुका प्रशासनाचे प्रशंसा करून आभार मानले व नागरिकांनी शासनाच्या कोणत्याही सोयी-सवलत्या पासून वंचित राहु नये असे आवाहन करून यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

    याच प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मुळ दस्ताऐवज व प्रमानपत्रे महत्त्वाचे असून शासकीय योजनाची जत्रा या उपक्रमातून निःशुल्क प्रमानपत्रे प्राप्त करून नागरिकांनी विकास साधावे असे म्हणत काही तृटया अडि-अडचणी येत असल्यास अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष पुरवावे याकड़ेही लक्ष वेधले.

   त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना ट्रैक्टर, अधिवास प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, पेसा प्रमानपत्रे, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, वारस प्रमानपत्रे, आधार कार्ड,शेतकरी प्रमाणपत्र, भुस्वामी दस्तावेज, वनहक्काचे पट्टे, काटेरी कुंपन, शिलाई मशीन , मानव मिशन अंतर्गत विद्यार्थिंना तब्बल 55 सायकल वितरित करून अन्य प्रमानपत्रांचे वितरण करण्यात आले. 

    उल्लेखनीय म्हणजे शासकीय योजनेची जत्राच्या माध्यमातून तालुक्यात तब्बल 33 हजाराचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार अनमोल कांबळे यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र वड्डी यांनी केले. 

यावेळी तालुक्यातील विविध गावातुन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी सर्वच विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेतले.