“वाघ,नेहमी करतात पाळीव प्राण्यांची शिकार … — वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज.. — वाघांच्या दहशतमुळे ग्रामस्थांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष… — दोन्ही वाघाना लवकर बेशुद्ध करून पकडण्यात येणार,:-अनिल भगत वनपरिक्षेत्राधिकारी..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी :- आमगाव येथील अनील सहारे या शेतकऱ्यांच्या दोन बकऱ्या आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान फस्त केल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

       पारशिवनी तालुक्यातील माहुली,चारगाव,बच्छरा,आमगाव,बाबुलवाडा,बिटोली,उमरी,पाली, नयाकुंड,मेहंदी नवेगाव खैरी,घोगरा महादेव,पालासावली, गुढरी वाढे,सोनेगाव,पालोरा माहुली,काळाफाटा,कुवारा भीवसेन आदी गावातील परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पट्टेदार वाघांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

        वाघांने आतापर्यंत २३ पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत.वाघाचे सदर हल्ले आता नित्याचेच झाल्याने गो-पालक चिंतेत आहेत.अनेक गावांतील ग्राम स्थांमध्ये वाघांची चांगलीच दहशत पसरली आहे.

         आज बुधवार सकाळच्या दरम्यान आमगाव बाबुलवाडा येथे गावाशेजारी मागील दोन दिवसांपासून पट्टेदार वाघांनी आपले तळ ठोकले असून अनेकांना दर्शनही दिल आहे.मुख्य मार्गावरही वाघ दिसून येत असल्याने वाहन चालकाची घाबरगुंडी उडाली आहे.या वाघांना जेरबंद करणे गरजेचे झाले आहे. 

        आज बुधवार सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान भर दिवसा सकाळी आमगाव येथील शेतकरी अनिल सहारे यांच्या दोन बकरींना वाघानी फस्त केल्याची घटना घडली.घटना स्थळी वनपरिक्षेत्र अधिकांऱ्यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक बावणे व पिलारे व वनमजुर यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली व दोन्ही मृत पाळीव बकरीचे पंचनामा केले.

**

या प्रसंगी ग्रामस्थांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष..

     वाघांचा शेतशिवारात वावर वाढला आहे.यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे.तर शेतमजुरही भितीपोटी शेतात जात नसल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत.

       तसेच या शेतमजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे.वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी वाघाला पळविण्यासाठी परिसरात फटाके फोडतात.तद्वतच एक दिवसाकरिता ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली व अंदाजे परिसरात ३० ठिकाणी कमरे लावण्यात आले,तरी मात्र वाघाला पकडण्याकरीता कुठलीही ठोस उपाययोजना वनविभाग करीत नसलयाने ग्रामस्थ वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत असून वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी वाघाला पळविण्यातच धन्यता मानत आहेत.

        प्रत्यक्षात या वाघांना वनविभागाने पकडून जंगलात सोडण्याची गरज आहे.तेव्हा वाघांच्या दहशतीपासून ग्रामस्थांना मुक्त करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाघांना तात्काळ जेरबंद करून जंगलात सोडावे,अशी मागणी सर्व ग्रामवासि शेतकरी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

**

कोट..

   दोन्ही वाघाना लवकर बेशुद्ध करून पकडण्यात येणार..

           अनिल भगत वनपरिक्षेत अधिकारी पारशिवनी.