Home Social कूरखेडा येथे महिला दिनाचे औचित्य साधूत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार…

कूरखेडा येथे महिला दिनाचे औचित्य साधूत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार…

      राकेश चव्हाण 

 तालुका प्रतिनिधी कूरखेडा 

           कूरखेडा नगरपंचायतीच्या वतीने महिला दिना निमित्य आयोजित महिला मेळाव्यात आरोग्य व स्वच्छता सभापती प्राची धोंडणे यांचा वतीने नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सर्व महिला व पूरूष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा साडी चोडी व पूरस्कार प्रदान करीत नूकताच सत्कार करण्यात आला.

            अशी माहीती आज दि १७ मार्च रोजी नगर पंचायत प्रशासनाने प्रसिद्धि पत्रका द्वारे दिली आहे.महिला मेळाव्यात महिलांचे विविध संस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.

               याप्रसंगी विशेष अतिथी साहायक पोलीस निरिक्षक प्रियंका आघाव,कृषी अधिकारी रूपाली जाधव,प्रा.डॉ.राखी शंभरकर, नगराध्यक्ष अनिता बोरकर,उपाध्यक्ष बबलू हूसैनी ,नगरसेवक अशोक कंगाले, आरोग्य व स्वच्छता सभापती प्राची धोंडणे, महिला व बाल कल्याण सभापती कांता मठ्ठे, उपसभापति दूर्गा गोटेफोडे, नगरसेवीका हेमलता नंदेश्वर, जयश्री रासेकर,कूंदा तितीरमारे,अल्का गिरडकर,आशा तूलावी,वैशाली काळे,सूमन घोडाम,सूधा नाकाडे,भीमाबाई सरदारे,माजी उपाध्यक्ष जयश्री धाबेकर,चित्रा गजभिए,अर्चणा वालदे,शारदा उईके,अल्का बावनथळे सह परिसरातील शेकडो महिला हजर होत्या.