Home शैक्षणिक शिक्षक,पालक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन,विद्यार्थ्यांना नवीन दिशा ठरविण्यास नव संजीवनी ठरू शकते...

शिक्षक,पालक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन,विद्यार्थ्यांना नवीन दिशा ठरविण्यास नव संजीवनी ठरू शकते :- प्राचार्य डॉ.एच.एम.कामडी… 

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

       मालेवाडा येथील स्थानिक महाविद्यालयामध्ये शिक्षक,पालक व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.एम.कामडी होते.प्रमुख पाहुणे म्हणून मेजर किरण वाढई,विद्यार्थ्यांचे पालक श्री. विजय बोरसरे,सौ.विजया लेंनगुरे,श्री.भगवानजी सयाम,माजी विद्यार्थी प्रतिनिधी खेमेश्वर गुंडरे,गोपाल करमकर,उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कामडी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षक आणि पालक यांच्याशी सुसंवाद आणि सहकार्य वाढवणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे शिक्षक,पालक व माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवीन दिशा ठरविण्यास नव संजीवनी ठरू शकते अशा प्रकारचे मत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

          त्यांनी पालकांच्या समस्या जाणून घेतल्या व माजी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.माजी विद्यार्थी मेजर किरण वाढई यांनी मार्गदर्शनपर भाषणात पूर्वी महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण होते,सध्या महाविद्यालयात तीन विषयात एम.ए. व एम.कॉम.याची सोय झाली आहे,त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. 

        सदर मेळावा मध्ये नवीन शैक्षणिक धोरण,शिष्यवृत्ती फॉर्म,स्पर्धा परीक्षा,महाविद्यालयातील सोयीसुविधा,राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) ची तयारी इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. 

         या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य पालक वर्ग,माजी विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रा.डॉ.पल्लवी काळे, प्रा.डॉ.वैद्य,प्रा.डॉ.राऊत,प्रा.आष्टेकर,प्रा.रामटेके,प्रा.डॉ.ठाकरे,प्रा.शहारे,प्रा.सहारे,प्रा.शहारे,प्रा.ठाकूर,श्री.उईके,बनपूरकर, श्री.सेलोकर,समर्थ,जांभुळे उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रमोद कुमरे,प्रस्तावना प्रा.डी.एम.नंदेश्वर व आभार प्रदर्शन प्रा.भगत नूरुटी यांनी केले.