भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संविधान बदलूच शकत नाही :- गृहमंत्री अमित शाह…

      निलय झोडे

नागपूर विभागिय प्रतिनिधी 

        दखल न्यूज भारत

साकोली : “काँग्रेसच्या होत असलेल्या दूष्प्रचारात भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत आल्यावर संविधान बदलणार आहे” हा दावा खोटा ठरवित देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व भारताचा गौरव भारतीय संविधान कुणी बदलवू शकत नाही असे रोखठोक उत्तर रविवार १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच साकोलीत झालेल्या सभेत दिले‌.

            भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), शिवसेना (शिंदे), आरपीआय महायुतीचे भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ वैनगंगा शैक्षणिक मैदानावर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला ७५ हजार ते ८० हजार जनसमुदाय उपस्थित होता.

           मंचावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस दिग्गज प्रफुल पटेल, भाजपा नेते तथा आमदार डॉ. परीणय फुके यांनीही सभेला संबोधित केले. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भारतीय जनता पार्टी बहुमताच्या उपयोग नेहमी देशाच्या सदुपयोगासाठी करते ३७० सारखे कलम हटवून देशाच्या संरक्षणासाठी बहुमताचा उपयोग केला आहे.

            बहुमताचा उपयोग हा नेहमी चांगल्या कामासाठी केला जातो मागील १० वर्षात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून आम्ही कधीही संविधानाला हात सुद्धा लावलेला नाही त्यामुळे आम्ही कधीच आमच्या पूर्ण बहुमताच्या दुरुपयोग केलेल्या नाही हा निव्वळ काँग्रेसच्या दूष्प्रचार आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संविधान बदलूच शकत नाही असे रोखठोक उत्तर त्यांनी दिले.

                यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय दलाल, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, आ. विजय रहांगडाले, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. विनोद अग्रवाल, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार राजकुमार बडोले, राजेश काशिवार, गोपाल अग्रवाल, राजेंद्र जैन, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, वैनगंगा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, प्रदेश सदस्य रेखा भाजीपाले, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल हलमारे शहर अध्यक्ष नितीन खेडीकर हे हजर होते. 

             सभेला ८० हजार जवळपास जनतेनी हजेरी लावली होती. या दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, गुन्हे शाखा अधिक्षक ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंह, निवडणूक यंत्रणा उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसिलदार निलेश कदम, साकोली ठाणे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नियंत्रणाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या सभेला बंदोबस्तात श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सीआरपीएफ, आरपीएफ, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार, पोलीस नायक, वाहतूक पोलीस, महिला पोलीस, होमगार्ड पथक असा १२०० जवळपास पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. या सभेला विशेष म्हणजे नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथून विविध टिव्ही, वेबन्यूज, डिजीटल मिडीयाची चमु येत या सभेचे थेट प्रक्षेपण केले.