डॉ.आंबेडकरांनी उपेक्षित वर्गाला प्रवाहात आणण्याचे काम केले :- हर्षवर्धन पाटील.. — बावडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!..

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचे महत्वपूर्ण काम केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षित वर्गाला प्रवाहात आणण्याचे काम आयुष्यभर केले, असे गोरोदगार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.14) काढले.

                बावडा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास हर्षवर्धन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

           हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, समता व मानवतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. अन्याय विविध संघर्ष करा असा संदेश त्यांनी जनतेला दिला. डॉ. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे आज देश एकसंघ आहे.

      बावडा गावात सुमारे 27 जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची गावची परंपरा आहे. विश्वरत्न आंबेडकर उद्यान व इतर विकास कामासाठी आणखी निधी आगामी काळात दिला जाईल, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी अशोकराव घोगरे, उदयसिंह पाटील, विजयराव घोगरे, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे आदिसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.