चांदूरबाजार येथे संत्रा विषयी चर्चासत्राचे आयोजन.. — दर्जेदार फळ उत्पादनात संत्रा झाडाची छाटणी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रॉड्रीगोओलिओ यांचे प्रतिपादन…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

        संत्रा बागेचे आरोग्य जपत दर्जेदार फळाचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्याकरता झाडाची तंत्रशुद्ध आणि वेळेवर छाटणी होणे गरजेचे आहे प्रकाश संश्लेषांनी ची क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रॉड्रीगो ओलिवा यांनी केले. 

नाशिक येथील सह्याद्री फार्म महा ऑरेंज पुष्पक श्रीरामजी खापरे यांच्या संयुक्त सहकार्याने चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथे पुष्पक श्रीरामजी खापरे यांनी संत्रा पिकावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू सचिन वाळुंज महा ऑरेंज कार्यकारी संचालक श्रीधर राव ठाकरे ,मनोज भाऊ जवंजाळ, तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी या चर्चासत्रामध्ये सहभागी होते त्याच्या सत्रात पुढे म्हणाले जागतिक स्तरावर भारतात लिंबूवर्गीय फळपिका खाली क्षेत्र अधिक आहे झाडाला अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषणाची क्रिया महत्त्वाची ठरते त्यामुळे झाडाच्या सर्व भागांना सूर्यप्रकाश मिळाला तर झाडाची निकोप वाढ होते भारतात मात्र बागेच्या व्यवस्थापनात हा मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला आहे झाडाच्या मध्यभागी असलेल्या फांद्यांना सूर्यप्रकाश पोहोचत नाही परिणामी प्रकाश संश्लेषणची क्रिया बाधित होते त्याकरिता तंत्रशुद्ध पद्धतीने झाडाची छाटणी केली पाहिजे अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनात नव्या पालवीची भूमिका देखील महत्त्वाची राहते एखाद्यावेळी कीड रोगा चा प्रादुर्भाव बागेत वाढला तर पाणा चे परीक्षण केले पाहिजे त्या आधारे झाडातील अनेक रोगांची निदान शक्य होते बागेची पाण्याची गरज लक्षात घेत पाणी देण्यावर भर असावा. मूळ व खोडाचा संपर्क सातत्याने पाण्याशी असला तर बुरशीजन्य रोग वाढतात त्यामुळे पाणी व्यवस्थापन देखील महत्त्वाचे राहते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनामती (नागपूर) शेतकऱ्यांना स्लाईट शोच्या माध्यमातून लिंबूवर्गीय त्यातही मुख्यतः संत्रा बागेच्या व्यवस्थापन विषयी माहिती देण्यात आली. अध्यक्ष भाषण आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मिळालेला मार्गदर्शन व चर्चासत्रात शेतकरी रोड्डरीगो ओलिवो शास्त्रज्ञाचे आभार मानले. आभार प्रदर्शन सूत्रसंचालन पुष्पक श्रीरामजी खापरे यांनी केले या संत्राच्या चर्चा सत्रा साठीसाठी तालुक्यातील सर्व उत्पादक शेतकरी आवर्जून उपस्थित होते तसेच शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाबाबत आमदार बच्चू कडू व पुष्पक श्रीरामजी खापरे यांचे सुद्धा आभार मानले.