छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती संपन्न.

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

         छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे मंगळवार दिनांक ११एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती संपन्न झाली. सुरवातीला प्रतिमेचे पूजन व हारार्रपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. भारत कल्याणकर यांनी सांगितले की समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्व सांगितले. आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पाहिली शाळा सुरु केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई ला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकविण्यासाठी सुशिक्षित बनविले आणि देशातील पाहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला. ज्योतिबानीं अनेक ग्रंथाचे लेखन सुद्धा केले आहे, अशा अनेक प्रकारच्या ग्रंथातून त्यानी समाजप्रबोधन केले. “प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे या प्रसंगी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व टाळगाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवने, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठींबा दिला. त्यानी गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवीला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पूनर्रचनेची मागणी केली असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष काळे यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र इचे यांनी केले. या कार्यमाला डॉ. हरीश काळे,प्रा. विपीन लिल्हारे, मुक्ता निभोरकर, श्री. दिनेश वाटणे, श्री. अविनाश कडू, रासेयो चे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.