खल्लार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

 

युवराज डोंगरे/खल्लार

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती खल्लार येथे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.

येथील बाजार चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळी गावातील बौध्द बांधवानी हारार्पन करुन पूजन करुन अभिवादन केले. सायंकाळी गावातून भव्य अशी मिरवणूक शांततेत काढण्यात आली या मिरवणूकीत लहान ते मोठ्यांपर्यंत नागरीक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या मिरवणूकीत खल्लारमधिल सर्व धर्माचे नागरिक सहभागी झाले होते