चंद्रपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

 

युवराज डोंगरे/खल्लार

खल्लार नजिकच्या चंद्रपूर येथे भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली.

सकाळी चंद्रपूर गावातील बौध्द विहारात 13 तारखेला डॉ रात्री 12 वाजता गावातील महिला व तरुणीनी केक कापून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

14 तारखेला सकाळी विहारात पूजा, हारार्पन करून अभिवादन केले. सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गावातील लहानमुले, महिला व पुरुषवर्ग सहभागी झाले होते.