हनुमान नगर नगर परिषद समाज भवन येथे जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे महिलाचा आंनद मेळावा संपन्न.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी : – जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे न प समाज भवन हनुमान नगर येथे महीला चा आंनद मेळाव्याचे आयोजन करून थाटात संपन्न करण्यात आला. 

         रविवार (दि.१४) मे ला समाज भवन हनुमान नगर कन्हान ला आयोजित जिजाऊ ब्रिगेड तर्फे आंनद मेळाव्याचे जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले यांचे अध्यक्षे त तर नगर परिषद कन्हान चे नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांचे हस्ते राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन आंनद मेळाव्याचे उदघाटन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. आंनद मेळाव्यात जिजाऊ ब्रिगेड सचिव छायाताई नाईक, पुष्पाताई चिखले, रंजनाताई इंगोले,अल्काताई कोल्हे, कल्पनाताई श्रीखंडे, येलेकर ताई आदीनी वेगवेगळे खादय पदार्थाचे स्टॉल लावुन सुंदर सजावट करण्यात आली असल्याने उपस्थितानी वेगवेगळ्या स्वाधिष्ट पदार्थाचा लाभ घेत आंनद व्यकत केला.कार्य क्रमाच्या यशस्वितेकरिता रिताताई बर्वे, मिनाक्षी भोयर , विद्या रहाटे, सपना इंगोले, प्रिती कुकडे, मायाताई भोयर, सुषमा बांते, आशा कैकाडे, श्रध्दा कडु, पुनम राठी सह जिजाऊ ब्रिगेड सदस्यानी सहकार्य केले.