श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयाचे अनावरण,उद्घाटन सोहळा खासदार अशोक नेते यांचे शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला.

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

दि. १४ मे २०२३

चामोर्शी: तालुक्यातील मौजा- रामाळा या ठिकाणी श्री.छत्रपती संभाजी महाराज मंडळ व कुणबी समाज संघटना रामाळा ता.जि.गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण सोहळा कार्यक्रमाला उद्घाटक खासदार अशोक नेते,सहउद्घाटक माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम,आमदार डॉ.देवराव होळी, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे,माजी सभापती रमेश बारसागडे,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा,राजे अवधेशवर महाराज,तालुकाध्यक्ष दिलिप चलाख, तालुकाध्यक्ष रवि नेलकूद्री,सरपंच अरूण देवतळे, उपसरपंच रवि पाल,राजू चौधरी, कबिर आभारे,किशोर डांगे,देवानंद चलाख,रविंद्र आभारे, दहेलकरजी, अतूल भिरकंटवार,आदी मंचावर उपस्थित होते.

गावातील प्रवेशद्वारावर मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करत ढोल, ताशाच्या गजरात गावातून फेरी काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सोहळा जय शिवराय व स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय घोषाने पार पाडून कार्यक्रमाचे शिवध्वज फडकवत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळाचे अनावरण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी प्रतिपादन करतांना या रामाळा गावात एकमताने,एकसंघटनेने, एकत्र येऊन राजमाताअहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व या २१ मे.ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा होत आहे.ही एक या गावातील एक संघटनेची कौतुकास्पद,गौरवशालीबाब आहे.महापराक्रमी, स्वराज्यरक्षक,

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती निमित्याने व जिने शिवबा सारखा पुत्र घडविला असे मॉं जिजाऊ यांच्या आज मातृदिनी आयोजित कार्यक्रम होत आहे ही सूद्धा आनंददायीबाब आहे.छत्रपती संभाजी राजे यांचे कर्तुत्व व कार्य जोपासा असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते केले.

श्री.छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी स्वतःची जागा दान म्हणुन उपलब्ध करून देणाऱ्या ताराबाई कवडूजी लंबुवार यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , मुखरू झरकर,प्रभाकर घोगरे,मारोती उमलवार, अतुल भिरकुटवार,लचमा झिरगावार,मारोती गोहणे,मुकुंदा गोहणे,तसेच मंडळातील सर्व सदस्यगण व कुणबी समाज संघटना यांनी परिश्रम करून योग्यरीतीने यशस्वी कार्यक्रम पार पडला.