पत्रकारिता क्षेत्र व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी व्हावी : – रविंद्र शिंदे… — जिल्ह्यात शांतता भंग व सुसंस्कृत परंपरेला गालबोट….

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

         गेल्या वर्षात जिल्ह्याच्या शांत व सुसंस्कृत परंपरा असलेल्या राजकारणाला गालबोट लागेल असे कृत्य व्हायला लागले आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तथा पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत असुन असे प्रकार वेळीच थांबविण्यात न आल्यास या जिल्ह्यात जंगलराज सुरू व्हायला वेळ लागणार नाही, असे मत शिवसेना (ठाकरे) गटाचे वरोरा विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे मांडले आहे.

          जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचेवर (दि.११) ला फायरींग झाली, सदर भ्याड हल्ला हा राजकिय षडयंत्राची शक्यता असू शकते, हे वेळीच तपासणे गरजेचे झाले आहे. यापूर्वी बल्लारशहा येथे अशीच एक हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे चंद्रपूर येथील माजी नगरसेवक नंदु नागरकर यांचे वर हल्ला करण्यात आला. नागरकर हे वारंवार सांगत आहे कि अटक केलेले हल्लेखोर हे बनावटी गुन्हेगार आहेत. मुळ गुन्हेगार हे अद्याप मोकाट आहेत. भद्रावती येथील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांचे वर अज्ञातांन्वये हल्ला करण्यात आला. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे यांचे वर देखील हमला करण्यात आला, तसेच वरोरा येथील एका पत्रकारावर हमला झाला. संतोषसिंह रावत यांचेवरील हल्ला हा सहाव्या क्रमांकाचा हल्ला आहे. व भविष्यात अजुन असे किती भ्याड हल्ले होतील याची भीती निर्माण झाली आहे. स्वतः माझेवर देखील हल्ला करण्याचा बेत आखण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत सुध्दा काही पुराव्यासह माहीती पोलिस खात्याला पुरविण्यात आली आहे. असे सर्व हल्ले राजकिय षडयंत्राचा भाग आहे का? राजकारणात विरोध करणारे, प्रस्थापितांच्या विरोधात स्वतःचा ठसा उमटविणारे, पत्रकारितेत निष्पक्ष लिहिणारे, असे अनेक या हल्ल्यांच्या रडारवर राहू शकतात. त्यामुळे आधीच्या सर्व हल्ल्यांची निकोप चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व हल्ल्यांचा सूत्रधार एक तर नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असुन राजकिय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना अश्या प्रकारे धमक्या व भ्याड हल्ला करुन भितीचे वातावरण जिल्ह्यात निर्माण केले जात आहे, असे रविंद्र शिंदे म्हणाले.

            जिथे राजकारणी व पत्रकार सुरक्षित नाही तिथे सामान्य जनता कशा प्रकारे सुरक्षित राहु शकते? हा प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडला आहे. तरी या सर्व घटनांची तार जोडून संबंधीत दोषीला अटक करणे गरजेचे असल्याने या प्रकरणाची चौकशी गृह खात्याने वरोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोप्पानी यांचे कडे देण्यात यावी, अशी मागणी रविंद्र शिंदे यांनी केली आहे.