ब्रेकिंग न्युज… चिचडोह बॅरेज मधे बुडून चार मृत्युमुखी.

ऋषी सहारे 

संपादक

         गडचिरोली _ चामोर्शी तालुक्यातील 3 कि .मी. अंतरावर असलेला चिचडोह बॅरेज मधे आपले मित्र परिवार पार्टी करण्याकरिता गेले असता त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही . जेवण झाल्यानंतर ते चिचडोहात उरतले परंतु त्याना पाण्याचा अंदाज न कळत्यामुळे ते खोल पाण्यात गेले व चौघे जन चिचडोह वैनगंगा नदि पात्रात बुडाले. चारही मृत्युदेह पाण्याबाहेर काढले असून त्यांची नावे कळु शकली नाही . चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले असल्याचे समजते.

       सविस्तर वृत्त असे की ‘ चामोर्शी येथील अमित स्टॉईल्स चामोर्शी चे मालक अमित याचा आज दि. १४ मे ला वाढदिवस होता . त्यामुळे अमित आपल्या ९ मित्रांसोबत चिचडोह बॅरेज येथे गेले. त्यांची पार्टी झाल्यानंतर ६ मित्र एकत्र होते तर 3 अलग. ६ पैकी ४ मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नदीपात्रात बुडाले . नवही मित्र चामोर्शी येथील रहिवासी आहेत. अजुनही मृत्युकाचे नाव कळाले नाही. सदर घटनेमुळे चामोर्शी शहरात शोककळा पसरली .