तालुक्यातील ग्रामिण व शहरी भागात डिवायएसपी व पो.नि. पारशिवनी यांचे नेतृत्वात रुटमार्च..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी : आगामी लोकसभा निवडणुका, होळी, गुड फ्रायडे, रमजान आदींच्या पार्श्वभूमीवर पारशिवनी शहरात व ग्रामिण भागात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पारशिवनी पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शहरात व ग्रामिण भागात रूट मार्च काढण्यात आला.

       पारशिवनी पोलिस ठाण्यापासून सावनेर मार्गे बाजार चौक व शिवाजी चौक मुख्य मार्गावरून बजार चौक खापरखेड मार्ग वरुन तहसील कार्यालय,नगरपंचायत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,समोरून खापरखेडा या मार्गाने हा रूट मार्च काढण्यात आला. 

       पारशिवनीच्या ग्रामिण भागातील दहेगाव जोशी,करंभाड,तामसवाडी,पालोरा,नया कुंड,नवेगाव खैरी,चारगांव,पालासावली, या सह अनेक ग्रामीण भागात पारशिवनी पोलिस निरीक्षक रविकांत थोरात,पोलिस उपनिरिक्षक शिवाजी भताने,पो. उप नि.श्री.पिसे,पो उप नि.श्री. राठौड असे रुटमार्च मध्ये एकूण येथील १३ पोलिस अधिकारी,R.P.F.पोलिस पथक,जवान,पोलिस स्टेशनचे पोलिस हवलदार,अंमलदार,पोलिस कर्मचारी,होमर्गाड,पोलिस जवान सहभागी झाले होते.