ईटगाव फाटा,खापरखेडा,पारशिवनी रोड येथील सुरु वेश्याव्यवसायावर धाड.. — देहव्यापार करणाऱ्या ०२ पिडीत महिलांची सुटका.. — आरोपीस केली अटक.. — नागपूर ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी:- इटगाव फाटा,खापरखेडा ते पारशिवनी रोड येथील सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायावर धाड टाकुन देहव्यापार करणाऱ्या ०२ पिडीत महिलांची सुटका करुन आरोपीस अटक केली.

     नागपूर ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई 

दिनांक १३/०३/२०२४ ते दिनांक १४/०३/२०२४ चे २०.५० वा. ते ०१.३० वा. दरम्यान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीण यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली आहे की, आरोपी नामे रूपेश चिंतामण कोहळे,रा. वार्ड नं. ०१, जय भोले नगर,चनकापूर ता. सावनेर हे स्वतःचे आर्थीक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमीष देवून देहव्यापारास प्रवृत्त करतात व त्यांना ग्राहकांना पुरवतात.

        इटगाव फाटा,खापरखेडा ते पारशिवनी रोड येथील आरोपी रामुजी उर्फ रामदास गुंडेराव काकडे यांच्या मालकीचे किरायाने घेतलेले काकडे बार अॅड रेस्टॉरेट या ठिकाणी देहव्यापार करवुन घेतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकुन पुढीलप्रमाणे कारवाई केली.

       मिळालेल्या प्राप्त खबरेनुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता आरोपी नामे- १) रूपेश चिंतामण कोहळे, रा. वार्ड नं. ०१, जय भोले नगर, चनकापूर ता. सावनेर २) पाहीजे आरोपी रामुजी उर्फ रामदास गुंडेराव काकडे यांचे विरुध्द कलम ३, ४, ५ स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६,सहकलम ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन ०२ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

       सदरची कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे, सपोनि अमित पांडे,पोहवा ललीत उईके,मपोहवा ज्योती वानखेडे,मपोहवा अर्चना कांबळे,मपोशि मालु मोहीते,पोशि कार्तीक पुरी,बालाजी बारगुले यांचे पथकाने केली.